Saturday, November 26, 2022

आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने अमेरिका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव संपन्न …

न्यू जर्सी -(१६ एप्रिल २०२२)
आंबेडकर इंटरनॅशनल मिशन या आंतरराष्ट्रीय संघटनेने या वर्षी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीचे आयोजन जर्सी शहरातील सिटी हॉल मध्ये आयोजित केले होते. कोविड साथीच्यामुळे दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर, न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि पेनसिल्व्हेनिया या त्रि-राज्य क्षेत्रातील आंबेडकरी जनतेने जर्सी शहरातील प्रतिष्ठित सिटी हॉलमध्ये हा विशेष दिवस उत्साहाने साजरा केला. या प्रसंगी शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
आंबेडकर इंटरनॅशनल मिशन आणि जर्सी सिटीच्या सिटी कौन्सिल यांच्या संयुक्त सहभागाने पार पडलेल्या कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतीक दर्जाच्या मानवतावादी , समानतावादी कार्याची दखल म्हणून या वर्षी पासून 14 एप्रिलला सिटी कौन्सिल च्या वतीने “समानता दिवस” म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी जर्सी सिटीच्या, सिटी कौन्सिलबद्दल एआयएमच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मानवतावादी मूल्यांचे समर्थन करण्याच्या दिशेने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय एक अग्रगण्य पाऊल ठरेल आणि अमेरिकेतील इतर सर्व राज्य अश्या प्रकारे उपक्रम हाती घेतील अशी आशा या प्रसंगी एआयएमच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

जगभरातील शैक्षणिक आणि नागरी समाजात डॉ. आंबेडकरांच्या कार्याबद्दल उत्सुकता आणि स्वारस्य वाढत असल्याने, विविध विचारवंतांशी संवाद साधण्यासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक कार्याचा आवाका वाढवण्यासाठी एआयएम ने हा कार्यक्रम हाती घेतला.

मुख्य कार्यक्रमात प्रा. टिमोथी लोफ्टस, प्रा. जेनिक आर रेडॉन, प्रा. जयश्री कांबळे, प्रा. बिजू मॅथ्यू आणि याशिका दत्त यांनी बाबासाहेबांच्या समानतेच्या कार्याची महती विशद केली आणि या नंतर एआयएम च्या सभासदांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.

एआयएम चे संस्थापक दिवंगत माननीय राजू कांबळे यांनी सुरू केलेली परंपरा पुढे चालू ठेवत, एआयएम ने डॉ. आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे यांचे पुस्तके मोफत वाटण्यासाठी या ठिकणी एक बूथ देखील उभारला होता. यावेळी न्यू जर्सी शहराचे महापौर स्टिव्हन फुलोप यांचे आंबेडकर इंटरनॅशनल मिशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी मा. पुरुषोत्तम खेडेकर यांचे चिरंजीव स्वप्नील खेडेकर आणि आंबेडकर इंटरनॅशनल मिशन चे सर्व पदाधिकारी, सहकुटुंब,तसेच न्यू जर्सी शहरातील पत्रकार असे २०० लोक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles